गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (07:22 IST)

जॉन आणि अदितीचा नव्या चित्रपटाचा लुक चाहत्यांना आवडला

First Look
अभिनेता जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी यांनी आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह हेही मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र, या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या फर्स्ट लूकमध्ये अदिती ही कुर्ता व शरारा, तर जॉन अब्राहम हा पगडी घातलेला दिसून येत आहे.
 
हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अदितीने पोस्ट केले की, “नवीन चित्रपटाचा शुभारंभ.’ 
 
यावर लाखो कॅमेंटस्‌ येत असून चाहत्यांना अदिती आणि जॉनचा लूक खूपच आवडला आहे. जॉन आणि अदिती हे या क्रॉस बॉर्डर लव्हस्टोरीत मुख्य नायकाच्या दादा-दादीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. या जोडीशिवाय यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ताही काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन काशवी नायर करणार आहे.