रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2019 (16:39 IST)

आर के स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला

राज कपूर यांच्या मालकीचा आर के स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला आहे. हा स्टुडिओ आता पाडण्यात येणार असून त्याजागी गोदरेज प्रॉपर्टीजकडून आलिशान इमारती बांधण्यात येणार आहेत. आर.के. स्टुडिओ हा चेंबूरमध्ये तब्बल 2.2 एकर परिसरात उभारण्यात आलेला आहे. शोमॅन राज कपूर यांनी हा स्टुडिओ बनवला होता. या स्टुडीओत राज कपूर यांनी ‘आग’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘श्री 420’, ‘मेरा नाम जोकर’ या सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शुटिंगकेले आहे. तसेच ऋषि कपूर आणि डिंपल कापडिया यांची डेब्यू फिल्म ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यासारखे चित्रपट देखील येथेच बनवण्यात आले होते.