मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (14:02 IST)

मी आत्महत्या करणार होती

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण' समोर आले आहे. अम्लीय पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली आहेत. 
 
दरम्यान, या प्रकरणावर अभिनेत्री सारा खान हिने प्रतिक्रिया दिली. या ड्रग्ज प्रकरणामुळे माझ्यावरदेखील काही जणांनी संशय व्यक्त केला होता. त्यावेळी मी स्वतःला सावरले नसते तर कदाचित आत्महत्या केली असती, असे खळबळजनक वक्तव्य तिने केले आहे. दिलेल्या मुलाखतीत साराने या ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केले. ती म्हणाली, या प्रकरणात काय खरे आहे अन्‌ काय खोटे हे मला माहीत नाही. पण मी देखील अम्लीय पदार्थांचे व्यसन करते असा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावरुन माझ्यावर जोरदार टीका होत होती. मी आजवर कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही. तरीदेखील काही टीकाकारांनी ठरवून माझ्यावर चुकीचे आरोप केले. या नकारात्मक कॉमेंट्‌समुळे माझी मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. कदाचित मी देखील आत्महत्या केली असती. परंतु मी वेळेवर स्वतःला सावरले आणि टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ज्या प्रमाणे तुम्ही कुटुंबातील स्त्रिांचा आदर करता त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा.