शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (09:57 IST)

अखेर कोजालने मौन सोडले

करण जोहर आणि काजोल यांची मैत्री अनेक वर्षांपासून खूप घट्‍ट आहे. करण तर काजोलला आपला लकी चार्म मानतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात एखाद्या छोट्याश भूमिकेत तरी काजोल दिसते. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटापासून हा सि‍लसिला सुरू आहे. करण आणि काजोलने त्यांच्या मैत्रीचे किस्से देखील अनेक कार्यक्रमात सांगितले आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. करण जोहरचे ऐ दिल है मुश्किल आणि अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला. शिवाय या चित्रपटाची निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यासाठी करणने मला पैसे दिले असे कमाल खान म्हणजे केआरकेने म्हटले होते.