1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (08:12 IST)

Dhadak 2 : करण जोहरने धडक 2 ची घोषणा केली, सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची लव्हस्टोरी दिसणार

 Dhadak 2
Movie Dhadak 2:  बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनच्या नवीन चित्रपट 'धडक 2' ची घोषणा केली आहे. यासोबतच चित्रपटाची स्टारकास्ट आणि रिलीज डेटही समोर आली आहे. 'धडक' प्रमाणेच 'धडक 2' देखील एक अनोखी प्रेमकथा असणार आहे.
 
'धडक 2'मध्ये तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाझिया इक्बाल यांनी केले आहे. करण जोहरने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या चित्रमय पोस्टरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे.
हे पोस्टर शेअर करत करण जोहरने लिहिले की, ही कथा थोडी वेगळी आहे, कारण एक राजा होता, राणी होती - जात वेगळी होती... कथा संपली. सादर करत आहोत सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी स्टारर धडक 2. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
धडक' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'धडक' हा मराठी हिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी व्हर्जन होता. 'धडक 2' झी स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला जात आहे.
 
Edited by - Priya Dixit