सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

चप्‍पल न घातल्यामुळे अभिनेता शाहिदची पत्नी झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्‍नी मीरा राजपूत सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर मीरा राजपूतचा एक फोटो मोठ्‍याप्रमाणात व्‍हायरल होत आहे. यामुळेच मीराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या फोटोत मीरा राजपूत चुडीदारमध्‍ये दिसत आहे. मात्र मीराच्‍या हातात एक बॅग आहे व त्‍यासोबत तिन्‍हे चप्‍पल न घालता ते हातात घेतले आहे. 
 
त्‍यामुळे मीराचा हा फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. या फोटोत मीरासोबत शाहीद कपूर देखील दिसत आहे. 
 
विशेष म्‍हणजे शाहिद आणि मीराचा हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळा संपन्‍न झाल्‍यानंतरचा आहे. सोशल मीडियावर एका यूजरने या फोटोवरुन मीराला ट्रोल करताना म्‍हटले आहे की, 'मीरा हे सगळे तु लोकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी करतेस का ?'...असा प्रश्‍न विचारला आहे. तर काहींने म्‍हटले आहे की...'हाय हिलमुळे पाय दुखायाल लागले' असे म्हटले आहे.