शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

T-Series 10 कोटी सब्सक्राइबर्स असलेलं जगातील पहिलं YouTube चॅनेल

भारतीय म्युझिक कंपनी T-Series चा YouTube चॅनेल 10 कोटी सब्सक्राइबर्ससह जगातील सर्वात मोठा YouTube चॅनेल बनला आहे. सब्सक्राइबर्सच्या लढाईत टी-सीरीजने गेम कॉमेंटेटर चॅनेल PewDiePie ला मागे सोडलं आहे. टी-सीरीजकडे सध्या 10 कोटींपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाले आहे. ही माहिती T-Series ने स्वतः ट्विट करून सांगितली आहे. YouTube ने देखील या उपलब्धतेवर ट्विट करून अभिनंदन केले आहे.
 
T-Series आणि PewDiePie यांच्यात नंबर 1 येण्यासाठी गेल्या 8 महिन्यांपासून लढाई सुरू होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये दोन्हीं  YouTube चॅनेल्सकडे 6.7 कोटी सब्सक्राइबर होते. मग या वर्षी मार्चमध्ये टी-सीरीजने 1 लाख सब्सक्राइबरसह प्यूडीपाईला मागे सोडलं. मार्च नंतर फक्त दोन महिन्यात टी-सीरीजने प्यूडीपाईला मागे सोडताना 10 कोटी सब्सक्राइबर्सची संख्या ओलांडली. परंतु, प्रथम 5 कोटी सब्सक्राइबर्सचा रेकॉर्ड PewDiePie जवळच  आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे T-Series ला 1983 मध्ये दिल्ली येथे गुलशन कुमारने सुरू केले होते. पूर्वी टी-सीरीजची ओळख भक्ती संगीतासाठी होती, पण नंतर बॉलीवूडचे बरेच गाणी टी-सीरीज स्टुडिओमध्ये तयार व्हायला लागले. यानंतर, कंपनीने चित्रपट निर्मितीस देखील प्रयत्न केले. गुलशन कुमारच्या निधनानंतर 2006 मध्ये भूषण कुमारने T-Series चा YouTube चॅनेल बनविला आणि आज 13 वर्षांत कंपनीने 10 कोटीची आकडेवारी ओलांडली आहे.