शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (22:15 IST)

अभिनेत्री प्रीती जैन दोषी, तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपात अभिनेत्री प्रीती जैन दोषी आढळली आहे. प्रीतीला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालायने हा निर्णय दिला. कोर्टाने अभिनेत्री प्रीती जैनसह तिघांना दोषी धरलं आहे.  तर गवळी टोळीतील दोघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.

प्रीती जैनने 2005 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. प्रीती जैनने मधुर भांडारकरांवर लैंगिक शोषणाचाही आरोप केला होता.  मात्र प्रीतीने मधुर भांडारकरांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना पैसे दिल्याचं सिद्ध झालं.