suvichar

बॉलिवूडमध्ये गाण्यासाठी पैसे मिळत नाहीत

सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:25 IST)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओजच यामाध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती गायकांच्या मानधनामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमधील गायकांना पुरेसे मानधन मिळत नाही. पैसे कमावण्यासाठी त्यांना इतर कामे करावी लागतात. असा खळबळजनक दावा नेहाने केला आहे. नेहा म्हणाली, अनेकांना वाटते की बॉलिवूडमध्ये गाणे गायल्यानंतर खूप पैसे मिळतात. कोट्यवधींच्या चित्रपटांमध्ये लाखो रुपयांचे मानधन गायकांना दिले जाते. मात्र, या निव्वळ अफवा आहेत. काही ठरावीक गायक सोडले तर कोणालाही पुरेसे मानधन मिळत नाही. एखादे गाणे सुपरहिट झाले तरच अतिरिक्त पैसे मिळतात. मग अशा वेळी गायक खासगी शो किंवा लाइव्ह इव्हेंट करुन पैसे मिळवतात. अनेक जण लग्न किंवा पार्टीमध्ये देखील गाताना दिसतात. काही लोक त्यांची खिल्ली उडवतात मात्र त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसतो. असा दावा नेहाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

नेहा आपल्या वादग्रस्त विधानांसोबतच डान्स आणि कॉमेडीसाठीही प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्राम आणि टिक- टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. नेहा गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणमुळे चर्चेत होती. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत असे म्हटले जात होते.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट्टसोबत मतभेद झाल्याच्या वृत्तांवर बॉबी देओलने मौन सोडले

भूमी पेडणेकरला लहानपणापासून आवडायचा इम्रान खान; आता ती 'अधुरे हम अधुरे तुम' मध्ये त्याच्यासोबत काम करणार

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!

भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन

पुढील लेख
Show comments