बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (15:39 IST)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमध्ये दया बेन येणार की नाही निर्माता असित मोदी म्हणाले…

tarak mehta
टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दया बेन या पात्राची एण्ट्री होणार आहे की नाही, या प्रश्नाने प्रेक्षक सध्या चिंतातूर झाले आहेत. विशेषत: शोचा नवा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ताज्या एपिसोडमध्ये दयाचा भाऊ सुंदर त्याच्या मित्रांसह गोकुळधाम सोसायटीत पोहोचल्याचे दाखवण्यात आले आहे. पण दयाची एण्ट्री झालेली नाही. त्यामुळे जेठालाल दुःख होते.
 
पुढे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सुंदर जेठालालला आश्वासन देतो की, तो अहमदाबादला जाईल आणि तीन महिन्यांत दयाला परत पाठवेल. त्यावर जेठालाल म्हणतो की, तीन नव्हे तर दोन महिन्यात पाठवा. त्यानंतर दया न आल्यास उपोषण करणार असल्याचे जेठा यांचे म्हणणे आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते आनंदापेक्षा जास्त निराश झाले. असे करून शोचे निर्माते त्यांच्या भावनांशी खेळत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
 
या प्रकरणी शोचे निर्माते असित मोदी म्हणाले की, ही कथेची बाब आहे. आम्ही सर्व गोष्टींवर काम करत आहोत, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याने सांगितले की, काही रसिक प्रेक्षक त्यांना शिवीगाळ देखील करत आहेत, कारण त्याला या शोची खरोखरच आवड आहे.