राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

raj kundra
Last Modified शनिवार, 21 मे 2022 (08:21 IST)
गेल्या वर्षी उघड झालेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी राज कुंद्रा यांना २० जुलै २०२१ रोजी अटक केली होती.

जुलैमध्ये राज कुंद्रा यांना अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये पाच संशयितांना अटक केली होती. संशयित आरोपी कथितरित्या अश्लील चित्रपट बनवून वेब सीरिज किंवा बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी देण्याची बतावणी करून फसवणूक करत होते. संशयितांनी महत्त्वाकांक्षी मॉडेल आणि अभिनेत्यांना अश्लील चित्रपटात काम करण्यास सांगून बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे आश्वासन दिले होते.
मालाड येथील मड बेटाजवळ किंवा अक्सा बिचजवळ बंगला किंवा अपार्टमेंट भाड्याने घेऊन चित्रीकरण करण्यात आले होते. चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रींना एका वेगळ्या कथेवर चित्रीकरण करण्याची बतावणी करून हे संशयित आरोपी न्यूड सीन चित्रीत करण्यास सांगत होते. अभिनेत्रींनी नकार दिला तर त्यांना कथितरित्या धमकी देण्यात आली आणि चित्रीकरणाचा खर्च वसूल करण्याचा इशारा देण्यात आला.

सब्सक्रिप्शनवर आधारित अॅपवर चित्रीत केलेल्या लघुचित्रफित अपलोड केल्या जात होत्या. ते पाहण्यासाठी ग्राहकाला पैसे भरून अॅप सब्सक्राईब करावे लागत होते. हा कंटेट पाहण्यासाठी सब्सक्राईबरला एक निश्चित रक्कम द्यावी लागत होती. मुंबई पोलिसांना सुगावा लागल्यानंतर या रॅकेटवर कारवाई केली. हॉटशॉट्स अॅपद्वारे हा गोरखधंदा सुरू असल्याचे उघड झाले होते.
त्यानंतर राज कुंद्रा यांच्या वियान कंपनीने यूकेमधील केनरिन या कंपनीशी करार केला होता. त्या कंपनीकडे हॉटशॉट्स अॅप होते. या कंपनीचा मालक राज कुंद्रा यांचा मेहुणा आहे. हॉट्शॉट्स अॅपचा वापर अश्लील क्लिप डाउनलोड करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी राज कुंद्रा यांच्यासह त्यांच्या कंपनीचे आयटी प्रमुख रेयान थोर्प यांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज कुंद्रा यांना जामीन मिळाला होता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

एक पावसाळी कवी

एक पावसाळी कवी
आठवणींना सखे तू उरात घे, पावसाच्या थेंबांना एका सुरात घे, आणि ह्यातलं काहीच जमलं नाही ...

’तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे

’तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ...

अमेरिकेत निर्मित पहिला मराठी चित्रपट 9 जुलै रोजी कोल्हापूर ...

अमेरिकेत निर्मित पहिला मराठी चित्रपट 9 जुलै रोजी  कोल्हापूर येथे  प्रदर्शित होणार
कोल्हापुरातील आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे वास्तव्य असलेल्या गौतम दिलीप पंगू ...

गिरनार म्हणजेच गिरी नारायण

गिरनार म्हणजेच गिरी नारायण
दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन ...

Ram Mandir Documentary: अयोध्येतील राम मंदिरावर ...

Ram Mandir Documentary: अयोध्येतील राम मंदिरावर डॉक्युमेंटरी बनवण्याची घोषणा, 500 वर्षांचा इतिहास समोर येणार
अयोध्येतील राम मंदिरासाठी लोकांनी किती संघर्ष केला, ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली ...