Marathi Biodata Maker

रजनीकांतची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल

तमिळ सुपरस्टार रजनीकांत हा जॅकी चॅन खालोखाल सर्वाधिक मानधन घेणारा आशियाई कलाकार म्हणून ओळखला जातो. रजनीकांत यांच्या प्रत्येक नवीन चित्रपटाचे त्यांच्या नावावर मानधनाचे नवे विक्रम जमा होत असतात. नुकतेच रजनीकांत यांनी नवीन चित्रपट स्वीकारला असून त्याचे मानधन ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. रजनीकांत आणि बॉलिवूड कलाकार अक्षयकुार यांनी एकत्रित अभिनय केलेला 2.0 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर रजनीकांत यांनी दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज यांचा नवीन चित्रपट स्वीकारला असून या चित्रपटासाठी त्यांना तब्बल 65 कोटी रुपये मिळणार आहेत. तमिळनाडूचे ज्येष्ठ नेते ए. करुणानिधी यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या सन पिक्चर कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी चाळीस दिवस राखीव ठेवले असून जून महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. या चित्रपटात तृषा कृष्णन आणि दीपिका पदुकोण या नायिका असतील असे या वृत्तात म्हटले आहे. रजनीकांत हे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले होते.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि CBFC चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन

आमिर खानचा 'लगान' त्याच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा प्रदर्शित होत आहे; निर्मात्यांनी एक हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित केला

पावसाळ्यात मित्रांसोबत फिरायला जा; भव्य ऐतिहासिक स्थळी, पांढरेशुभ्र धबधबे आणि किल्ल्यांना कवेत घेणारे काळेभोर ढग...देखणा नजराणा

आमिर खान तिसऱ्यांदा ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅट शी लग्न करणार

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

पुढील लेख
Show comments