रेखाच्या पत्राने गहिवरला आमीर
बॉलीवूड दिग्गज अभिनेत्री रेखाने दंगल चित्रपटासंदर्भात स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र आमीर खानला दिले आणि पत्र वाचतानाच आमीर खानला अश्रू अनावर झाले.
आमीर खानच्या तुफान यशस्वी ठरलेल्या दंगल चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी त्याने नुकतीच एक पार्टी आयोजित केली होती. त्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीसह सहसा अशा पार्ट्यांना न जाणारी रेखाही उपस्थित राहिली होती. आमीरचे नुसते कौतुक करून रेखा थांबली नाही दंगल तिला खूपच आवडला हे सांगण्यासाठी तिने स्वहस्ताक्षरातले पत्र आमीला दिले. आमीरने पार्टीतच या पत्राचे जाहीर वाचन केले व स्वत:चे कौतुक ऐकताना त्याला अश्रू अनावर झाले. हे पत्र माझ्यासाठी खास गिफ्ट आहे व या पत्रासाठी माझ्या हृहदयात खास जागा असेल असेही आमीर म्हणाला.