1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (16:00 IST)

अभिनेत्रीसोबत छेडछाडीचा प्रकार, रेल्वे प्रवासातील घटना

sanusha santosh actress

मावेली एक्सप्रेममधून प्रवास करणाऱ्या सानुशा संतोष या  मल्याळम अभिनेत्रीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. मात्र, छेडछाड करणा-या आरोपीला तिने टीसी येईपर्यंत पकडून ठेवले. 

प्रवास करतांनाती एक्सप्रेसमधील वरच्या बर्थवर झोपली असताना एका व्यक्तीने तिच्याशी छेडछाड केली. यादरम्यान तिने मदतीसाठी इतरप्रवाशांना आवाज दिला. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. याबाबत तिने अधिक माहिती देतांना सांगितले की,प्रवासादरम्यान झोपले असताना माझ्या ओठांवर काहीतरी असल्याचे जाणवले. यावेळी जाग आली असता एका व्यक्ती हात माझ्या ओठांवर असल्याने मला भीती वाटली. मात्र, त्या व्यक्तीचा मी हात पकडला आणि मदतीसाठी बाजूच्या प्रवाशांकडे मदतीसाठी आवाज दिला. यावेळी बाजूच्या प्रवाशांनी माझी मदत केली नाही. त्यानंतर काही वेळानंतर फक्त स्क्रिप्ट रायटर आणि एक जण प्रवासी माझ्या मदतीला आले. ही घटना साधारणत: रात्री एक वाजताच्या सुमारास घडली असल्याचे तिने सांगितले.