मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (09:13 IST)

'कलंक' चे प्री-बुकिंग सुरू

'कलंक' या चित्रपटाचा टीझर समोर आला आणि बॉलिवूड चाहत्यांमध्ये आपली हवा पसरवण्यासाठी यशस्वीही ठरला. आता सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाचं प्री-बुकिंग सुरू करण्यात आलंय. हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून सव्वा महिना बाकी आहे. सिनेमा १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा सिनेमा पहिल्याच दिवशी १८ ते २० करोड रुपयांच्या कमाईसह बॉक्स ऑफिसवर ओपनिंग करु शकतो. या सिनेमाचा आणखीन एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आललंय. या पोस्टरमध्ये 'जफर' अर्थात वरुण धवन एका रानबैलासोबत झुंज देताना दिसतोय.