1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जुलै 2020 (08:59 IST)

विद्या बालन म्हणते ‘पास नहीं तो फेल नहीं’

vidya balan
अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 
 
‘शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘पास नहीं तो फेल नहीं’ हे पहिलंवहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात विद्या पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. 
 
शकुंतला देवी चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित करताना मनस्वी आनंद होत आहे.  गणित या विषयाचा फोबिया दूर करण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. हा खूपच गमतीशीर पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. मुलांसोबत हे व्हर्चुअल सेशन करताना आणि त्यांच्यासोबत हा मंच शेयर करताना खूप आनंद आला. हा एक वेगळा परंतु चांगला अनुभव होता”, असं विद्या या गाण्याविषयी बोलताना म्हणाली. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.