शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (16:39 IST)

काय सांगता, राखी सावंतला मुख्यमंत्री व्हायचंय !

अभिनेत्री राखी सावंत नेहमी चर्चेत असते. वेळोवेळी असे काही वक्तव्य करून ती प्रसिद्धी मिळवत असते. कधी वादग्रस्त विधानामुळे तर कधी नव्या नव्या व्हिडीओमुळे ती चर्चेत असते. सध्या ती दुबईच्या व्यावसायिक असलेल्या आदिल खान शी रिलेशन मध्ये असून तिच्या लग्नाच्या बातम्या येत आहे.आता राखीने व्हिडीओ शेअर करून तिचे मुख्यमंत्री व्हायचंय असं स्वप्नाबाबद्दल सांगितलं आहे.  तिला मुख्यमंत्री व्हायच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने मला मुख्यमंत्री केले तर मला काय करायला आवडेल असे सांगितले आहे. ती म्हणाली मला देशाचे मुख्यमंत्री केले तर मी रस्ते ड्रिमगर्ल हेमामालिनीजी जेवढ्या सुंदर आहेत तसेच सुंदर रस्ते बनवेन. जश्या त्या आहेत , त्यांची कंबर असे सुंदर रस्ते बनवेन. हे विनोद म्हणून घेऊ नका. ती म्हणाली की, जर चहा करताना मोदीजी पंत प्रधान बनू शकतात तर मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. ती सध्या आपल्या या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 
 
Edited By - Priya Dixit