शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. 'बोले' तो स्टार...
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (15:35 IST)

BIRTHDAY SPECIAL: ऋषी कपूरशी निगडित 10 रोचक फैक्ट्स

बॉलीवूडमध्ये ऋषी कपूरचे नाव एक सदाबहार अभिनेत्याच्या रूपात सामील केले जाते, ज्याने आपल्या रूमानी आणि भावपूर्ण अभिनयामुळे किमान तीन दशकांपासून प्रेक्षकांमध्ये आपली खास जागा बनवली आहे.          
 
4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईयेथे जन्म घेणार्‍या ऋषी कपूरला अभिनयाची कला विरासताहून मिळाली. त्याचे वडील राज कपूर फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता-निर्देशक होते. घरात फिल्मी वातावरण असल्यामुळे ऋषी कपूरला चित्रपटाची आवड लागली आणि तो सुद्धा नायक बनण्याचे स्वप्न बघू लागला.  
         
ऋषी कपूरने आपल्या करियरची सुरुवात आपल्या वडिलांद्वारे निर्मित चित्रपट 'मेरा नाम जोकर'पासून केली. आता जाणून घेऊ ऋषी कपूरशी निगडित काही फॅक्ट्स:
 
* 'मेरा नाम जोकर' ऋषी कपूरचे पहिले चित्रपट नव्हते. या अगोदर तो 'श्री 420'मध्ये लहान मुलाच्या रूपात दिसला होता. नन्हे ऋषी चित्रपटाचे गीत 'प्यार हुआ इकरार हुआ'मध्ये भाऊ रणधीर कपूर आणि रीमासोबत चालताना दाखवला होता.  
 
* असे मानले जाते की ऋषी कपूरला त्याचे वडील राज कपूरने लाँच करण्यासाठी 'बॉबी' चित्रपट तयार केले होते. पण ऋषी कपूरने सांगितले होते की 'मेरा नाम जोकर'च्या अपयशानंतर राज कपूर यांची आर्थिक परिस्थिती फारच बिघडल्यामुळे ते कुठल्याही टॉप स्टारला घेऊन चित्रपट साइन करू शकत नव्हते.  
 
* 'बॉबी'च्या यशानंतर ऋषिने 90पेक्षा अधिक चित्रपटात रोमँटिक रोल केले.   
 
* ऋषी आणि त्याचा मुलगा रणबीर दोघांनी आपल्या पहिल्या चित्रपटात टॉवेल घालून दृश्य दिले आहे. ऋषिने चित्रपट 'बॉबी'मध्ये तर रणबीरने 'सांवरिया'मध्ये.  
 
* 'बॉबी'मध्ये ज्या दृश्यात ऋषी सर्वात आधी डिंपलला भेटतो ते दृश्य नर्गिस आणि राज कपूरच्या पहिल्या भेटीवर आधारित होते.  
 
* 'अमर अकबर एंथोनी'च्या एका दृश्यात ऋषी नीतूला तिच्या असली नाव 'नीतू' बोलावतो. हे दृश्य तुम्ही चित्रपटात बघू शकता.  
 
* ऋषी आणि नीतू सिंगने सोबत इतके चित्रपट केल्यानंतर ते दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. आपल्या रिलेशनशिपदरम्यान ऋषी एक स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड होते आणि नीतूला संध्याकाळी 8:30 नंतर काम करण्याची परवानगी नव्हती.  
* नीतू सिंगची आई ऋषी कपूरला काही जास्त पसंत करत नव्हती म्हणून नितूला ती ऋषीसोबत फिरायला जाऊ देण्याच्या विरोधात होती. जेव्हा कधी दोघेजण डेटवर जायचे तर नीतूची कजिनला तिची आई सोबत पाठवायची.  
 
* ऋषी-नीतूच्या लग्नात एवढी गर्दी होती की नीतू ती गर्दी बघून बेशुद्ध झाली होती तसेच ऋषीला देखील चक्कर आले होते.  
 
*  चित्रपटात ऋषी कपूरने जे काही स्वेटर्स घातले होते ते प्रेक्षकांनी फारच पसंत केले होते.