No rivalry, Sushmita and I worked well together: Lara | सुष्मिताशी भांडण नाही- लारा दत्ता
IFM
IFM'आपल्या देशात फक्त आम्हा दोघींनाच मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळाला आहे. मग आम्हीच भांडू लागलो तर त्यापेक्षा दुःखाची बाब कोणती असेल? असा सवाल करून सुष्मितासोबत मी पडद्यावर अधिकाधिक काळ दिसावे हीच माझी इच्छा आहे. यापूर्वी आम्ही पडद्यावर एकत्र येऊ शकलो नाही. म्हणूनच आता आलेली संधी खरोखरच चांगली आहे, असे लारा म्हणाली.
कुणाच्या वाट्याला किती वेळाची भूमिका आली यावरून दोघींमध्ये जुंपली असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये पसरली आहे. पण आम्हा दोघींमध्ये सामंजस्य असल्याचे लाराचे म्हणणे आहे. सुष्मितासोबत आणखी पुढेही काम करण्याची तिची इच्छा आहे. डेव्हिड धवन कदाचित हीच करामत पुन्हा घडवून आणतील, असा तिला विश्वासही आहे.
डू नॉट डिस्टर्ब हा डेव्हिड धवन दिग्दर्शित सिनेमा असून यात लारा, सुष्मितासह गोविंदा, रितेश देशमुख, सौहेल खान, रणवीर शौरी आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकेत आहेत.
यात लारा डॉलीच्या भूमिकेत आहे. डॉली अनेकांच्या स्वप्नातली राणी आहे. पण तिचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि ती तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते.
