अनुवाद कलेच्या सृजनशीलतेचे उदाहरण, संग्रह - जलतरंग
अनुवाद कलेच्या सृजनशीलतेचे उदाहरण संग्रह - जलतरंग
एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रचनांचे भाषांतर फक्त शाब्दिकच नाही तर भावनात्मक असून हे स्वतंत्रपणे एखाद्या सृजनाच्या समांतर आहे. यामुळे एक साहित्यिक विधाच नाही तर एकूण सृजनाला नवनवीन उंची देणारे हे एक आगळेवेगळे उपक्रम आहे. हे विचार श्रीकांत तारे यांनी सुषमा मोघे यांच्या हिंदीतून मराठीत भाषांतरित, मूळ लेखिका ज्योति जैन यांच्या लघुकथा संग्रह जलतरंग याच्या विमोचन प्रसंगी मांडले.
शॉपिज़न डॉट कॉम यांच्याकडून प्रकाशित या मराठी पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी, भाषांतरकार सुषमा मोघे यांनी आपले मनोगत सांगत आपले कुटुंबीय आणि शुभचिंतक यांचे मनापासून आभार व्यक्त करत दोन्ही भाषांसाठी असलेल्या आपल्या प्रेमळ सृजनाला एक समृद्धशील सेतु या प्रकारे चित्रण केले.
वामा साहित्य मंचातर्फे आयोजित या कार्यक्रमात मूळ कृतिच्या लेखिका ज्योति जैन यांनी मराठीत आपले मनोगत मांडले आणि भाषांना आपसात संवादाचा सेतु व सांस्कृतिक सखी म्हणून संबोधन दिले. आपण हे सुद्धा म्हणालात कि नेहेमी शिकत असल्याने आपल्यात विनम्रतेचा गुण जोपासला जातो आणि भाषा आपल्याला सृजनशील असण्यास मदत करते.
या कृतिंवर आपले विचार व्यक्त करतांना अंतरा करवड़े यांनी आधी हिंदी लघुकथा संग्रह जलतरंग याचे वैशिष्ट्य हिंदी भाषेत सांगितले आणि आज तेरा वर्ष पूर्ण झाल्यावरही यातील व्यवस्थापरक रचना कशा प्रकारे प्रासंगिक आहे ही चर्चा केली. भाषांतरित पुस्तकावर मराठी भाषेत व्यक्त होतांना आपण यास सांस्कृति सृजनशीलतेसोबत हिंदीतून मराठीत एक साहित्यिक शुभ प्रवेशाची उपमा दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना ही भारती भाटे यांनी सादर केली, रेयांश मोघे यांनी अतिथी स्वागत करुन उत्तम स्वागत उद्बोधन दिले. कार्यक्रमात अतिथी परिचय वैजयंती दाते आणि शैला अजबे यांनी सादर केला. वंदना पुणतांबेकर यांनी उत्तम मंच संचालन केले. शेवटी पूजा मोघे यांनी आभार प्रदर्शन केले.