शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2016-2017
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2016 (12:07 IST)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

सरकारने वचन दिल्याप्रमाणे गेली 4 दशक होणार वन रँक वन पेंशनची मागणी पुर्ण केली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
दहशतवाह जागतिक धोका आहे, दहशतवादाला मुळापासून संवपण्यासाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
सीमारेषेपलीकडील उफळता दहशतवाद रोखण्यासाठी महत्वाची पावल उचलली जातील - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
पठाणकोट दहशतवादी हल्ला उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलाचं अभिनंदन - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
युनेस्को क्रिएटीव्ह सिटीज नेटवर्कसाठी वाराणसी आणि जयपूर या 2 शहरांचा समावेश करण्यात आला आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
आर्थिक विकास दर दर वाढला आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने प्रगती होत आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
2015मध्ये सर्वात जास्त वीज उत्पादन करण्यात आलं - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत केंद्र सरकार ११८ शहरात विविध प्रकल्प राबवत आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
वेतनाचे व्यवस्थित वाटप व्हावे आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी मनरेगा योजनेमध्ये बदल करण्यात आले - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
स्किल इंडिया योजनेत ७६ लाख नागरीकांना प्रशिक्षण - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
उद्योग-व्यवसाय अनुकूल करणा-या देशांसंदर्भात जागतिक बँकेची जी ताजी आकडेवारी आहे, त्यामध्ये भारताच्या क्रमवारीत १२ स्थानांची सुधारणा झाली आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
मेक इन इंडियामुळे ३९ टक्के परदेशी गुंतवणूक वाढली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
सर्वांना घऱ पुरवण्यासाठी सरकार बांधील - प्रणव मुखर्जी.
ग्रामीण विकासाला आमचे पहिले प्राधान्य आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
नई मंझील योजनेतंर्गत मदरशातील २० हजार मुले कौशल्यआधारीत प्रशिक्षण घेत आहेत - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
सरकारने अलीकडेच शेतक-यांच्या हितासाठी पीक विमा योजना सुरु केली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
जन धन योजना ही जगातील यशस्वी आर्थिक समावेशक योजना आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
देशाच्या समृद्धीसाठी शेतकरी सुखात असणे आवश्यक - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
देशातील तब्बल ६२ लाख नागरिकांनी गॅस सबसिडी सोडली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी .
नवीन बँक खाती उघडल्यामुळे गरीबी कमी होण्याची अपेक्षा आहे, ४.४५ लाख घरे बांधण्यासाठी २४,६०० कोटींचा फंड - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
माझ्या सरकारने तीन नव्या सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजना आणल्या - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याच्या आपले आश्वासन पूर्ण करण्यावर सरकार कटिबद्ध आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
आमच्या सरकारचा उद्देश सबका साथ, सबका विकास आहे, गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
गरीबांचे, शेतक-यांचे कल्याण आणि युवकांना रोजगार देण्यावर माझ्या सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेत दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना संबोधित करत आहेत.
विरोधी पक्ष गंभीर आणि मजबूत असेल तर, लोकशाही सशक्त होते, सर्व विरोधी पक्ष अधिवेशन यशस्वी करतील अशी अपेक्षा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
योग्य पद्धतीने टिका होईल आणि संसदेचे अधिवेशन सुरळीत चालेल अशी अपेक्षा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेमध्ये येण्यासाठी निघाले.