शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (14:05 IST)

या गावात सुरु होणार 10 वी आणि 12 वीचे वर्ग

10th and 12th classes will start in this village
- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत
- जी भविष्यातही कोरोनामुक्त गाव राखण्याची खात्री देतील
- जी गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करतील
- कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले
- इयत्ता 10 वी साठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करुन 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा
- आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली
-कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे. 
-बैठकीस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.