Garlic pickles लसणाचे लोणचे
साहित्य : 1 किलो लसूण, 45 ग्रॅम मेथी, मोहरी, हळद, शोप, कलोंजी, मीठ, तिखट आणि सरसोचे तेल आवश्यकतेनुसार.
कृती : सर्वप्रथम लसूण वाळवून एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात मीठ, तिखट, मेथी, कलोंजी, शोप आणि मोहरी टाकून भांड्याला 3 दिवस झाकून ठेवावे. नंतर त्यात इतके तेल टाकावे की लोणच त्यात मुरून जाईल व 1 आठवड्याने ते लोणच वापरण्यास काढू शकता.