गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

कांदे - कैरीचा तक्कू

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी, 1 मोठा कांदा, 2 चमचे शेंगदाण्याची पूड, 2 टेबल स्पून तिखट, मीठ-साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर चिरलेली, एक टेबल स्पून तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं व हिंग. 
 
कृती : कैरी कांद्याचे सालं काढून त्यांना किसून घ्यावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, तिखट, जिरं, मीठ, साखर, कोथिंबीर टाकावी. तेल गरम त्यात फोडणी तयार करावी व मिश्रणात टाकून एकजीव करावे. उन्हाळ्यात हा तक्कू मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.