शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (17:10 IST)

कैरीचा आंबट-गोड-तिखट तक्कू

mango pickle
साहित्य: एक कैरी, दोन कांदे (मध्यम आकाराचे), तिखट, मीठ, गूळ, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मेथी बी, अर्धा चमचा मोहरी, आवडीनुसार हिंग (चिमुटभर)
 
कृती:
 
१. कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या.
 
२. या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला गूळ आणि तिखट टाकून आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
 
३. तेल तापवून त्यात मोहरी टाका. नंतर  मेथी बी तळून घ्या.  हे बी लालसर झाले की हिंग टाका. ही फोडणी थोडी कोमट झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणावर टाका.
 
यामुळे  इन्स्टन्ट रेसिपीने तुमच्या जेवणात वेगळीच चव येईल. थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये हा तक्कू ४-५ दिवस आरामात टिकतो. तेव्हा नक्की ट्राय करा.