गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (11:22 IST)

मेथीदाण्या चे लोणचे

सर्वप्रथम 1 वाटी मेथी दाणे घ्या. त्या मेथी दाण्याला 3 तास पाण्यात भिजवत ठेवा. 3 तासा नंतर त्याला थोडं 10 ते 15 मिनिट सुखवून मेथीदाण्या ला एका सुती कापडात त्याची पुरचुंडी बांधून एका बंद डब्यात ठेवा 8 तास जेव्हा मेथीदाण्या ला मोड (कोंब) आलेले दिसतील तेव्हा ते लोणच्या साठी तयार.
 
साहित्य :
1 वाटी मेथीदाणे (मोड आलेले)
1 वाटी गूळ गूळ  
2 लिंबाचा रस 
अर्धी वाटी मोहरी ची डाळ  
1/2 चमचा हिंग
मीठ चवीनुसार
1/2 चमचा हळद
तिखट (आवडी नुसार)
1 ते दीड वाटी तेल
 
कृती :
 
प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल थोडं थंड झालं की त्यात मोहरीची दाळ, तिखट, हळद, हिंग टाकून ते तेल थंड होऊ द्या. तेल थंड होई पर्यंत एका पसरट भांड्यात मोड आलेले मेथीदाणे टाका त्यात चवी नुसार मीठ टाका, गुळ टाकून आणि छान हलक्या हाताने मिक्स करा. आता या मेथीदाण्याच्या मिश्रणावर ते थंड झालेलं लोणच्याचा मसाला(तेल) टाका आणि वरून लिंबाचा रस टाकून परत छान मिसळा. मेथीदाण्याचे लोणचे तयार.