1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (22:44 IST)

कच्च्या कैरीचे लोणचे

Raw curry pickles recipe
सध्या कैरीचा हंगाम आहे.या दिवसात कच्च्या कैरीचे लोणचे खूप चविष्ट लागत. चला तर मग झटपट तयार होणाऱ्या कैरीच्या लोणच्याची साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
 
साहित्य- 
2 -4 कच्च्या कैऱ्या, 2 चमचे लाल तिखट, चवी प्रमाणे मीठ, 1/2  चमचा साखर,1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग,1/2  चमचा जिरे, 1/2  चमचा मोहरी, फोडणीसाठी तेल , 
 
कृती :
सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून चिरून लहान फोडी करून घ्यावा.फोडणीसाठी तेल गरम करावे .त्यात जिरे मोहरी घालावे .
हळद,हिंग,तिखट,साखर घाला. मिश्रण परतून घ्या आणि गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यावर या मिश्रणात कैरीच्या फोडी घालून व्यवस्थित मिसळून घ्या.फोडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. 
चवी प्रमाणे मीठ घाला आणि पुन्हा हलवून घ्या. झाकून ठेवा त्यात पाणी सुटेल .आता तेल तापत ठेवा आणि चांगले गरम करून घ्या. नंतर तेल थंड करायला ठेवा आणि पूर्णपणे थंड झाल्यावर हे तेलात लोणच्यात घालून द्या. कैरीचे लोणचे खाण्यासाठी तयार . कैरीच्या फोडी तेलात तुडुंब बुडवून ठेवा अन्यथा त्याला बुरशी लागू शकते.