सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (17:19 IST)

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे

How to do Kapalbhati Yoga during Corona period yogasan tips in marathi
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः अनुलोम विलोम, भस्त्रिका,  उद्गीथ,, भ्रामरी, उज्जयी आणि कपालभाती करण्याचा कल वाढला आहे. कपालाभाती प्राणायाम हठ योगाच्या शतकर्म क्रियांच्या अंतर्गत येतात. या क्रिया आहेत -त्राटक,नेती,कपालभाती,धौती,बस्ती आणि नौली .आसनांमध्ये सूर्य नमस्कार,प्राणायामात कपालभाती आणि ध्यान मध्ये विपश्यना यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कपालभाती करण्यापूर्वी अनुलोम-विलोम केले जाते. अनुलोम विलोम चा सराव झाल्यावरच कपालभाती केले जाते. चला तर मग कपाल भाती कसे करावे जाणून घेऊ या.  
 
* किती प्रभावी आहे हे? 
मेंदूच्या अग्रभागाला कपाल असे म्हणतात आणि भातीचा अर्थ आहे ज्योती.हे प्राणायामात सर्वात प्रभावी प्राणायाम मानले जाते. ही वेगाने केली जाणारी रेचक क्रिया आहे. या मुळे मेंदूत ऑक्सिजनची पातळी वाढते, फुफ्फुसांना बळकटी येते आणि बद्धकोष्ठता, गॅस,ऍसिडिटीचा समस्येवर हे प्रभावी आहे. 
हे प्राणायाम चेहऱ्यातील सुरकुत्या आणि डोळ्याच्या खालील काळपटपणा दूर करून चेहऱ्याची चमक वाढवते.  
दात आणि केसांचे सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतात. शरीरातील चरबी कमी होते. शरीर आणि मनाचे सर्व प्रकारचे नकारात्मक घटक आणि विचार नाहीसे होतात.
 
* हा प्राणायाम कसा करावा?
सर्व प्रथम, आपण अनुलोम-विलोम चा सराव करावा.नंतर पद्मासनात, सिद्धासनात,किंवा वज्रासनात बसून श्वास सोडण्याची प्रक्रिया करा. श्वास बाहेर सोडताना पोट आत ढकलायचे आहे. लक्षात असू द्या की श्वास घ्यायचा नाही कारण श्वास आपोआपच आत घेतला जातो. 
 
* कालावधी - कमीत कमी 1 मिनिटांपासून प्रारंभ करत 5 मिनिटे करा. 
 
* खबरदारी: फुफ्फुसात किंवा मेंदूचा आहार असल्यास हे प्राणायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. सुरुवातीला हे प्राणायाम केल्याने डोळ्यापुढे अंधारी येते.चक्कर येतात कारण हे प्राणायाम केल्याने मेंदूत रक्त संचार वाढतो. म्हणून प्रथम अनुलोम-विलोम, कुंभक आणि रेचक चा सराव केल्यावरच हे प्राणायाम करा. 
* या प्राणायामाचा सराव मोकळ्या हवेत करा, आपण गच्ची वर,बाल्कनीत देखील हे करू शकता.