गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

घरच्या घरी तयार करा शेजवान सॉस

जास्तकरून इंडो चायनीज डिशमध्ये शेजवान सॉस घातला जातो पण कधी तुम्ही विचार केला आहे की हे घरी कसे बनवू शकता का? आज आम्ही तुम्हाला शेजवान सॉस तयार करण्याची विधी सांगत आहोत जे फारच टेस्टी लागते. तुम्ही याला बनवून आरामात एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता. शेजवान सॉसला मोमोज़, पराठे किंवा फ्राइड राइससोबत सर्व करू शकता.  
 
साहित्य - वाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप, तेल- 1/3 कप, लसणाची पेस्ट - 4 चमचे, आल्याची पेस्ट - 3 चमचे, सोया सॉस- 1 चमचा, टोमॅटो केचप- 3 चमचे, साखर - 1/4 चमचा, मीठ - चवीनुसार.  
 
विधी - सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्या. एक कप पाण्यात लाल मिरची ज्याच्या बिया काढलेल्या असतील त्यांना उकळून घ्या. जेव्हा उकळणे सुरू होईल तेव्हा त्याला कमी आचेवर ठेवा आणि 5 मिनिटापर्यंत उकळा. त्यानंतर पाणी गाळून मिरच्यांना हलक्या हाताने वाटून घ्या. आता एक पेनामध्ये तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर मिरच्यांची पेस्ट, सोसा सॉस, टोमॅटो केचप, साखर आणि मीठ घालून मिक्स करा. मध्यम आचेवर ठेवा. जेव्हा सॉस शिजून जाईल आणि तेल सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. सॉसला थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हा सॉस किमान 2 आठवड्यापर्यंत राहू शकतो.