आपणही मुलांना देत आहात का रेडिमेड फूड? स्टडीत समोर आली धक्कादायक माहिती
मुलांसाठी बाजारात उपलब्ध रेडिमेड फूड त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहेत. ही धक्कादायक माहिती एका वैज्ञानिक अभ्यासानुसार समोर आली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की या उत्पादनांमध्ये सर्वसामान्य प्रमाणांपेक्षा जास्त साखर असते, ज्यामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.
धान्य उत्पादनांमध्ये 92% साखर
लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मुलांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थाच्या शुद्धतेचा अभ्यास केला. या माध्यमातून असे आढळले की मुलांना देण्यात येत असलेले रेडिमेड धान्याच्या 92 टक्के उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण उच्च असतं. वैज्ञानिक तपासणीत असे आढळले आहे की काही लोकप्रिय उत्पादनांमध्ये इतकी साखर असते की जास्त काळ ते खाल्ल्याने मुलांना लठ्ठपणा किंवा मधुमेह होऊ शकतो.
साखर पाच बिस्किटांइतकी
काही ब्रँडमध्ये 30 ग्रॅम घटकांमध्ये 12 ग्रॅम साखर असल्याचे आढळले, जे न्याहारीसाठी पाच बिस्किटे खाण्यासारखे आहे. किंवा असे म्हटले जाऊ शकते की एक बॉऊल रेडिमेड फूडमध्ये तीन चमचे साखर टाकली गेली आहे. संशोधकांनी असे सांगितले की ही उत्पादने शक्य तितक्या लवकर मुलांच्या पदार्थातून काढून टाकली पाहिजेत.
चॉकलेट फ्लेवर अधिक धोकादायक
अहवालात असे आढळले आहे की चॉकलेट फ्लेवरमध्ये तयार केलेल्या रेडिमेड बेबी फूड उत्पादनांमध्ये प्रति बॉऊलमध्ये 8.7 ग्रॅम साखर असते. याव्यतिरिक्त, 60 टक्के उत्पादनांमध्ये देखील मध्यम किंवा उच्च प्रमाणात मीठ असते. तसेच, त्यामध्ये आवश्यक फायबरचे प्रमाण कमी आहे.
श्रीमंत देशांमध्ये मुले आईच्या दुधापासून वंचित
लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की जगातील श्रीमंत देशांतील फक्त 38.4 टक्के मुलांना सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करवलं जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मानकांनुसार, बाळांना सहा महिन्यांसाठी फक्त आईचे दूध दिले पाहिजे, परंतु उच्च-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, एक तृतीयांशपेक्षा अधिक मुलांना स्तनपान करवणे चिंताजनक आहे. दुसरीकडे, निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील 47.4 टक्के बाळांना सहा महिन्यांपासून स्तनपान करवलं जातं. 2010 ते 2018 पर्यंत 57 देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला.