Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 2 ऑक्टोबर 2010 (12:06 IST)
नेमबाजीत २० सुवर्ण जिकू : राजवर्धन राठोड
राष्ट्रकुल स्पर्धेची क्वीन्स बॅटन रिले इंडिया गेटवर होती. बॅटनचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेला अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविणारा कर्नल राजवर्धन पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, मी स्पर्धेत सहभागी होणार नसलो तरी भारतीय नेमबाज या स्पर्धेत किमान २० सुवर्णपदके पटकावतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा यंदा दिल्लीत होत आहे, हे अभिमानास्पद आहे.