शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|

पाहुण्‍यांच्या स्वागतासाठी बाजारही सज्ज!

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विदेशी पाहुणे देशात दाखल होत आहेत. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील बाजारही सज्ज झाले आहेत.

दिल्लीतील व्यापार्‍यांनाही या गेम्सची उत्सुकता लागली असून, या कालावधीत व्यवसायात वाढ होण्याची आशा त्यांना आहे.

दिल्लीचे ह्रदय मानल्या जाणार्‍या कॅनॉट प्लेस येथील दुकानदारांना योग्य दरात पाहुण्यांना सामान देण्‍याच्या सूचनाही सरकारतर्फे करण्‍यात आल्या आहेत.