Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 2 ऑक्टोबर 2010 (11:31 IST)
उदघाटन सोहळ्याची तिकिटांची विक्री नाही !
प्रतिष्ठेची राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा सुरू होण्यास आता काहीच तास बाकी राहिले असताना उदघाटन सोहळ्याची शेकडो महागडी तिकिटे विकली गेलेली नाहीत. समारोप सोहळ्याची तर हजारो तिकिटे शिल्लक आहेत. २५ आणि ५० हजार रुपये किमतीची ३०० ते ४०० तिकिटे शिल्लक असली, तरी उर्वरित दोन दिवसांत ती विकली जातील.
समारोप सोहळ्याची मात्र हजारो तिकिटे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत, असे संयोजन समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.