Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2010 (10:42 IST)
उद्घाटन समारंभात बिंद्रा आणणार ‘क्वींस बॅटन’
ऑलिंम्पिमध्ये भारतासाठी गोल्डमेडल आणणार्या अभिनव बिंद्राला कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात क्वींन्स बॅटन आणण्याचा मान देण्यात आला आहे.
तीन ऑक्टोबरपासून दिल्लीत गेम्सना सुरुवात होत आहे. क्वींस बॅटन दिल्लीत दाखल झाली असून, तीन तारखेला याचे उद्घाटन केले जाणार आहे.
नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मान बिंद्राला देण्यात आला असून, तो उद्घाटनाला क्वींस बॅटन आणणार असल्याचे कलमाडींनी म्हटले आहे.