शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 3 ऑक्टोबर 2010 (11:17 IST)

सुरक्षिततेच्या कारणांवरुन आज दिल्ली बंद

आज कॉमनवेल्थ गेम्सचे उद्घाटन केले जाणार आहे. अनेक महत्वाच्या व्यक्ती आज राजधानी दिल्लीत दाखल होत असल्याने आज दिल्ली बंद करण्‍यात आली आहे.

शहरातील मॉल्स, दुकाने, इतकेच काय तर वाहनांनाही रस्त्यावर न येण्‍याचे आदेश देण्‍यात आले असून, प्रत्येक चौकात पोलिस तैनात करण्‍यात आले आहेत.

14 ऑक्टोबर रोजीही अशाच प्रकारे बंद पाळला जाणार असून, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स मात्र उघडी असणार आहेत.