बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By एएनआय|

ऊर्जासुरक्षेसाठी अणुकरार आवश्यक: राहुल

कॉंग्रेसचे तरूण खासदार व सरचिटणीस राहुल गांधी यांनी गरीबी निर्मुलनासाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वपूर्ण यासाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका मांडली.

देशातील गरिबी हटवण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत असणार, याबाबत शंका नाही, असे वक्तव्य त्यांनी विरोधकांना शांत करण्यासाठी केले. या लक्ष्यपूर्तीसाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली. विश्वासमत ठरावावरील चर्चेत बोलताना त्यांनी कॉंग्रेसचा सदस्य म्हणून नाही तर भारतीय नागरिक म्हणून बोलणार असल्याचे सुरूवातीलाच स्पष्ट केले. राहुल बोलत असताना बहूजन समाज पक्षाच्या काही खासदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.