शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (07:59 IST)

राज्यात १० हजार ४४२ नव्या करोना रुग्णांची नोंद

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. रविवारी  १० हजार ४४२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ५०४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. एका दिवसात ४८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५९ लाख ८ हजार ९९२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५६ लाख ३९ हजार २७१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे एकूण १ लाख ११ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार ५८८ सक्रिय रुग्ण आहेत.
 
राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.४४ टक्के इतकं आहे. तर मृत्यू दर १.८८ टक्के इतका आहे. सध्या ९ लाख ६२ हजार १३४ करोना रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ६ हजार १६० रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
 
मुंबईत एकूण ७ लाख १५ हजार ६६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६ लाख ८० हजार ८२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार १८३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार १६६ सक्रिय रुग्ण आहेत.
 
पुण्यात आतापर्यंत एकूण १० लाख ३५ हजार २४३ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १० लाख १ हजार ८२६ जणांनी करोनावर मात केली. करोनामुले आतापर्यंत १५ हजार १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात १८ हजार ५७१ सक्रिय रुग्ण आहेत.