शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (22:06 IST)

मुंबईत बुधवारी 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत गेले तीन दिवस कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असताना बुधवारी  पुन्हा एकदा मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. मुंबईत बुधवारी 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
 
मुंबईत बरं झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के इतका आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 36 दिवसांवर आहे.  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.