गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (09:24 IST)

इचलकरंजीतील ४ वर्षीय बालक कोरोनामुक्त

येथील कोरोनाबाधीत ४ वर्षाच्या बालकावर यशस्वीरित्या उपचार करून आयजीएम रुग्णालयातुन सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि शासकीय अधिकारी यांनी टाळ्या वाजवत फुलांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला. येथील रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन जाणारा हा पहिला रुग्ण आहे.

५ वाजण्याच्या दरम्यान रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बालकाला निरोप दिला. यावेळी या बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. जोरदार टाळ्या वाजवून पाठवनी करतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कोरोनाबाधीत रुग्ण असलेले हे बालक कोरोनामुक्त झाल्याचा हा शहरातील पहिलाच रुग्ण ठरला आहे. त्यामुळे शहरवासीयांतुन समाधान व्यक्त होत आहे.