शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (08:33 IST)

कोरोनाचे ५५३७ नवे रुग्ण दाखल

राज्यात बुधवारी कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी  १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार  ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.