शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)

राज्यात 766 नवे कोरोना रुग्ण, 929 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात  मंगळवारी 766 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली , 929 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या खाली आली असून, सध्याच्या घडीला 9 हजार 493 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 31 हजार 297 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 77 हजार 379 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.68 टक्के झाला आहे. राज्यात 19 रुग्ण दगावले असून, आजवर 1 लाख 40 हजार 766 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 48 लाख 44 हजार 896 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 1,033 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत आणि 96 हजार 042 लोक होम क्वारंटाईन आहेत.