मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:32 IST)

राज्यात 848 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

महाराष्ट्रात शुक्रवारी  848 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर, 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 974 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सध्या 9 हजार 187 रुग्ण सक्रीय आहेत.
 राज्यातील कोरोनाबाधितांच्या  संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 40 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 1 हजार 065 रुग्ण वैद्यकीय संस्थेत (institutional quarantine) उपचार घेत आहेत.