शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (12:09 IST)

75 दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्ण, गेल्या 24 तासांत 60471 नवीन प्रकरणे, 2726 मृत्यू

देशात 75 दिवसांनंतर कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 60,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि कोरोना विषाणूमुळे दोन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
 
कोविड -19 चे एका दिवसात 60,471 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 2,95,70,881 झाली आहे. 75 दिवसानंतर, देशात संसर्गाची इतके कमी केस आले आहेत. आणि दैनंदिन संसर्गाचे प्रमाणही 3.45 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
 
मृतांची संख्या 3.77 लाख
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संक्रमणामुळे आणखी 2726 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 3,77,031 झाला आहे. उपचारांतील प्रकरणेही 9,13,378 वर आली आहेत, जी संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 3.09 टक्के आहे. गेल्या 24 तासांत, उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 59,780 ने खाली आली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता  95.64 टक्के आहे.
 
संसर्ग दर 3.45 टक्के
आकडेवारीनुसार, देशातील कोविड -19 चे एकूण 38,13,75,984 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी सोमवारी 17,51,358 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दैनंदिन संसर्ग दर 3.45 टक्के आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे. त्याच वेळी, साप्ताहिक संसर्गाचे प्रमाणही 4.39 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची 39,27,154 लस दिली गेली त्यानंतर एकूण लसींची संख्या 25,90,44,072 इतकी झाली.