शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 14 जून 2021 (23:16 IST)

कोरोना: अहमदनगर मधील कोव्हीड सेंटर मध्ये लग्न सोहळा

सध्या कोरोनाचे प्रकरण कमी झाले आहे.आणि कोरोनाची दुसरी लाट देखील मंदावत आहे.हे बघून राज्यात लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.या संधीला साधून अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात एक आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पडला. 
 
नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन जोडप्यांनी चक्क कोव्हीड सेंटर मध्ये आपला लग्न सोहळा पार पाडला. लग्न केलेल्या या जोडप्याचे नाव राजश्री काळे आणि डॉ.राहुल कदम असे आहे. त्यांना लग्नात केला जाणारा खर्च टाळून अगदी साध्या सोप्या पद्धतीने लग्न करायचे होते. त्यामुळे त्या दोघांनी हा निर्णय घेतला.
 
त्यांनी लग्नासाठी पैसे खर्च न करता ते पैसे कोव्हीड सेंटरला देणगी स्वरूप देण्याचे ठरविलें.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
त्यांनी कोव्हीड सेंटरमध्ये लग्न करायचा निर्णय घेऊन आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात तिथूनच करायचे ठरविले.