1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (15:43 IST)

राज्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

Another MLA
राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. या आमदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होता. लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 
 
यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.