सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (08:23 IST)

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.
 
सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. आयएएस संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर संजय कुमार हे मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. संजयकुमार फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणार आहेत.
 
मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे.
 
कोण आहेत संजय कुमार?
 
संजय कुमार  हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे
संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.
संजय कुमार गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतात
अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
 
1984 च्या बॅच चे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील.