शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By नवीन रांगियाल|
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (15:29 IST)

Prone Position काय आहे? काय खरंच प्रोन पोझिशन कोविड रुग्णांसाठी प्रभावी आहे?

कोरोनापासून बचावासाठी जगभरात अनेक प्रकाराचे उपाय केले जात आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे मृतकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात प्रोनिंग पद्धत याबद्दल देखील खूप चर्चा होत आहे. ही पद्धत अनेक ठिकाणी वापरण्यात येत आहे.
 
या पद्धतीत रुग्णाला पोटावर झोपण्यास सांगितलं जातं. जाणून घ्या काय आहे ही पद्धत का याचा वापर करण्याची गरज भासत आहे-
 
जगभरात कोविड -19 संक्रमणाचे प्रकरण वाढत आहे. अनेक फोटो समोर येत आहे ज्यात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये अत्याधुनिक व्हेंटिलेटरवर रुग्ण दिसून येत आहे.  व्हेंटिलेटरमुळे त्यांना श्वास घेण्यात मदत होते परंतू या फोटोंमध्ये एक खास गोष्ट दिसून येत आहे. अनेक रुग्ण पोटावर झोपलेले दिसत आहे. 
 
खरं तर ही पद्धत फार जुनी आहे ज्याला प्रोनिंग म्हणतात. याने श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या रुग्णांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. या पोझिशनमध्ये झोपल्याने ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये पोहोचते.
 
इंदूरचे प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्‍टर सतीश अग्रवाल यांच्यामते वास्तविक, फुफ्फुसे पाठीमागे असतात. अशात ऑक्सिजनच्या कमीमुळे रुग्णाला पाठीवर न झोपवता पोटावर झोपण्यास सांगितल्यावर ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहचण्यास मदत होते. जेव्हाकि पाठीवर झोपवल्याने फुफ्फुसांवर दबाव पडतो अशात ऑक्सिजनची गरज असणार्‍या रुग्णांना असुविधा होऊ शकते. म्हणून अनेकदा ही पद्धत प्रभावी ठरते.
 
त्यांनी सांगितले की रुग्णांना प्रोन पोझिशनमध्ये काही तास झोपवता येतं ज्याने त्यांच्या फुफ्फुसात साठविलेले द्रव सहजतेने हलू शकतं. याने रुग्णांना श्वास घेणे सोपं जातं.
 
इंटेंसिव्हे केअर यूनिटमध्ये देखील कोविड-19 च्या रुग्णांसह या तंत्राचा वापर खूप वाढला आहे.
 
जागतिक आरोग्य संस्थेने देखील 12 ते 16 तासापर्यंत प्रोनिंग पद्धत वापरण्याविषयी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ही पद्धत मुलांसाठी देखील वापरता येऊ शकते परंतू योग्य आणि सुरक्षित पद्धत अमलात आणण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते.
 
संशोधन
अमेरिकन थोरॅसिक सोसायटीने चीनच्या वुहानमधील झियान्टेन हॉस्पिटलमध्ये फेब्रुवारी महिन्यात एआरडीएस असणारे 12 कोविड रुग्णांवर अभ्यास केला. या अभ्यासानुसार, प्रोन पोझिशनमध्ये असणार्‍या लोकांमध्ये फुफ्फुसांची क्षमता जास्त होती.
 
मीडिया रिपोर्टप्रमाणे 1970 च्या दशकात प्रोनिंगचे फायदे पहिल्यांदा वापरण्यात आले. तज्ज्ञांमते 1986 नंतर हे तंत्रज्ञान जगभरातील रूग्णालयात वापरण्यास सुरवात झाली.
 
प्रोफेसर लुसियानो गॅटिनोनी या पद्धतीवर प्रारंभिक अभ्यास आणि आपल्या रुग्णांवर यशस्वीरीत्या वापर करणार्‍या डॉक्टर्सपैकी एक आहे. लुसियानो या दिवसांत एनिस्थिसियोलॉजी आणि पुनरुज्जीवनशी संबंधित विज्ञान तज्ञ आहेत.