बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (17:26 IST)

मुंबईत प्रथमच स्वदेशी लशीच्या चाचणी होणार

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी निर्मितीच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात करण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या एथिक्स समितीकडे पाठविला असून मंजुरी मिळाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. मुंबईत या लशीच्या चाचण्या प्रथमच होत आहेत.
 
भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी निर्मित केलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. देशभरात दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना यांसह १० राज्यांत २१ ठिकाणी २८ हजार ५०० जणांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईत या चाचण्या करण्यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे.