शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (09:46 IST)

गजलक्ष्मी व्रत कथा Gaj Laxmi Vrat Katha

एकेकाळी महर्षी श्री वेदव्यास हस्तिनापूर आले. त्याचे आगमन झाल्याचे ऐकून महाराज धृतराष्ट्र त्यांना सन्मानासह राजमहालात घेऊन आले. त्यांचा स्वर्ण सिंहासनावर विराजित करून त्यांचे पूजन केले. श्री व्यास यांना देवी कुंती आणि गांधारी यांनी हात जोडून प्रश्न केला- हे महामुने! आपण त्रिकालदर्शी आहात म्हणून आपल्याकडे विनंती आहे की असे एखादे सोपे व्रत आणि पूजन सांगावे ज्याने आमच्या राज्यातील राज्यलक्ष्मी, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील.
 
यावर श्री वेद व्यास म्हणाले- आम्ही एका अशा व्रताचे पूजन करण्याचे वर्णन आपल्याला सांगत आहोत ज्याने येथे सदैव लक्ष्मीचा वासत असून सुख-समृद्धी नांदेल. हे व्रत देवी महालक्ष्मीचं आहे, याला गजलक्ष्मी व्रत असे देखील म्हटलं जातं. हे दरवर्षी पितृपक्षाच्या अष्टमीला विधिपूर्वक केलं जातं. '
  
हे महामुने! या व्रताबद्दल विस्तारपूर्वक माहिती सांगण्याची कृपा करा. तेव्हा व्यास म्हणाले- 'हे देवी! हे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला प्रारंभ केलं जातं. या दिवशी स्नान केल्यानंतर 16 सुताच्या दोरा घेऊन त्याला 16 गाठी बांधून त्याला हळदीने पिवळे करावे. दररोज यावर 16 दूब आणि 16 गव्हाचा धागा अर्पित करावा. पितृपक्षात येणार्‍या अष्टमीला उपास करून मातीच्या हत्तीवर श्री महालक्ष्मीची प्रतिमा स्थापित करून विधिपूर्वक पूजन करावे.
 
या प्रकारे श्रद्धेने महालक्ष्मीचं व्रत केल्याने राज्यलक्ष्मीत सदैव अभिवृद्धी होते. या प्रकारे व्रत विधान सांगून श्री वेदव्यास आपल्या आश्रमाकडे निघून गेले.
 
इकडे वेळ साधून भाद्रपद शुक्ल अष्टमी पासून गांधारी आणि कुंती आपआपल्या महालात नगरातील स्त्रियांसह व्रत आरंभ करू लागल्या. या प्रकारे 15 दिवस निघाले. 16 व्या दिवशी गांधारीने नगरातील सर्व प्रतिष्ठित स्त्रियांना पूजेसाठी आपल्या महालात बोलावून घेतले. माता कुंतीकडे कोणीही पूजेसाठी गेले नाही. वरून गांधारीने देखील कुंतीला आमंत्रित केले नाही. असे घडल्यामुळे कुंतीला अपमान वाटू लागला. त्या पूजेची तयारी न करता उदास होऊन बसल्या.
 
जेव्हा पांडव युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव महालात आले तर कुंतीला उदास बघून त्यांनी विचारले- हे माते! आपण उदास का आहात? आपण पूजेची तयारी का केली नाही? ' तेव्हा कुंतीने म्हटले- 'हे पुत्र! आज महालक्ष्मी व्रत उत्सव गांधारीच्या महालात साजरा होत आहे.
 
त्यांनी नगरातील सर्व स्त्रियांना आमंत्रित केलं आणि तिच्या 100 पुत्रांनी एक विशाल मातीचा हत्ती निर्मित केला. सर्व महिला त्या हत्तीच्या पूजनासाठी गांधारीकडे निघून गेल्या, माझ्या येथे कोणीही आले नाही.  
 
हे ऐकून अर्जुनने म्हटले- 'हे माते! आपण पूजनाची तयारी करा आणि नगरात घोषणा करवून द्या की आमच्या येथे स्वर्गातील ऐरावत हत्तीचे पूजन होणार. '
 
यावर कुंतीने गावभरात कळवून पूजेची तयारी करू लागली. तिकडे अर्जुनने बाणाद्वारे स्वर्गातून ऐरावत हत्ती बोलावून घेतला. इकडे हल्ला होऊ लागला की कुंतीच्या महालात तर स्वर्गातून इंद्राचा हत्ती ऐरावत पृथ्वीवर उतरवून पुजलं जाणार आहे. हे कळल्यावर सर्व नर-नारी, वृद्ध, बालगोपाळ यांची गर्दी होऊ लागली. गांधारीच्या महालातून स्त्रिया आपआपल्या पूजेचं सामान घेऊन कुंतीच्या महालाकडे जाऊ लागल्या. बघता-बघता कुंतीचं महाल गजबजून गेलं.
 
माता कुंतीने ऐरावताला उभे राहण्यासाठी अनेक रंगांचे चौक मांडून नवीन रेशमी वस्त्र घातले. सर्व स्वागतासाठी फुलांची माळ, अबीर, गुलाल, केशर हातात घेऊन उभे होते. जेव्हा स्वर्गातून ऐरावत हत्ती पृथ्वीवर उतर असताना त्याच्या दागिन्यांची ध्वनी चारीकडे पसरू लागली. ऐरावताचे दर्शन झाल्यावर सर्वीकडे जय-जयकार होऊ लागली.
 
संध्याकाळी इंद्राने पाठवलेला ऐरावत कुंतीच्या भवनात चौकात उतरला, तेव्हा सर्वांनी पुष्प-माला, अबीर, गुलाल, केशर इतर वस्तूंनी त्याचे स्वागत केले. राज्य पुरोहित द्वारे ऐरावतावर महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करून वेद मंत्रोच्चारण द्वारे पूजन करण्यात आले.
नगरातील सर्वांनी महालक्ष्मी पूजन केले. नंतर अनेक प्रकाराचे पक्वान्न ऐरावताला खाण्यासाठी देण्यात आले आणि त्याला यमुना नदीचे पाणी प्यायला देण्यात आले. राज्य पुरोहित द्वारे स्वस्ती वाचन करून महिलांद्वारे महालक्ष्मीचे पूजन केले गेले.
 
16 गाठीच्या दोरा लक्ष्मीला अर्पित करून सर्वांनी आपआपल्या हातावर बांधला. ब्राह्मण भोज नंतर दक्षिणा स्वरूप स्वर्ण आभूषण, वस्त्र इतर दान करण्यात आले. नंतर स्त्रियांनी मधुर संगीतासह भजन कीर्तन करून संपूर्ण रात्र महालक्ष्मी व्रत जागरण केलं. दुसर्‍या दिवशी राज्य पुरोहित द्वारे वेद मंत्रोच्चारासह सरोवरात मूर्ती विसर्जन केलं गेलं. आणि ऐरावताला विदाई देऊन इंद्रलोकात पाठवलं.
 
या प्रकारे ज्या स्त्रिया श्री महालक्ष्मी व्रत विधिपूर्वक करतात त्यांच्या घरात धन-धान्य आणि भरभराटी राहते, त्यांच्या घरात सदैव महालक्ष्मीचा वास असतो.  
 
यासाठी महालक्ष्मीची स्तुतीत हे म्हणावे-
 
'महालक्ष्‍मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरि।
हरि प्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे।।'