शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (14:18 IST)

गणपतीची कहाणी... ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी

Ganpatichi Kahani
ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी. 
निर्मळ मळे, उदकांचें तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. 
मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. 
संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. 
अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे, पाविजे, चिंतिले, लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही पांचां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.